पशुवैद्यकीय हॉस्पिटल्स, दवाखाने आणि उप-केंद्रांच्या नेटवर्कद्वारे पशुवैद्यकीय आरोग्य काळजी पुरविली जाते. खालील संस्थांमध्ये या सेवा उपलब्ध आहेत.
पशुवैद्यकीय आस्थापने | गणना |
पशुवैद्यकीय हॉस्पिटल्स | 5 |
पशुवैद्यकीय दवाखाने | 25 |
मुख्य ग्राम उप-केंद्रे | 52 |
पशु हॉस्पिटल्स/दवाखान्यांद्वारे पुरविल्या जाणार्या सेवा
-
- अपघातात सापडलेल्या पशुंचे उपचार
- आजारी, त्रासदायक, जखमी आणि वेदनाग्रस्त प्राण्यांवर उपचार – मोठ्या आणि लहान
- जनावरांच्या गर्भधारणेवर उपचार आणि जनावरांची प्रसूती करताना आवश्यक मदत
- पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी
- एच.एस, बी.क्यू, एफएमडी, एन्ट्रोटोक्सीमिया,अँथ्रॅक्स, स्वाइन फिव्हर, फाऊल पॉक्स, रानीखेत रोग, रॅबिज पूर्व आणि नंतर लस, बर्ड फ्लू, केएफडी इत्यादी संक्रात्मक आणि सांसर्गिक रोगांविरुद्ध लसीकरण
- गाई/म्हशींचे कृत्रिम रेतन
- पशुधन आणि विमा दाव्याच्या विमा संरक्षणासाठी आरोग्य प्रमाणपत्र
- विविध पशुसंवर्धन कार्यक्रम/योजना आणि अर्जाविषयी माहिती आणि मार्गदर्शन
- पशुधन आणि कुक्कुट फार्म बद्दल तांत्रिक मार्गदर्शन
- मांस तपासणी
- पोलिस आणि विद्युत विभागाला पशुवैद्यकीय प्रमाणपत्रे
- शवविच्छेदन तपासणी
- प्राणी कल्याण अंतर्गत सेवा प्रदान करणे
उप-केंद्रांद्वारे पुरविल्या जाणार्या सेवा
- आजारी जनावरांना प्रथमोपचार
- पशुधन आणि कुक्कुटांच्या संसर्गजन्य रोगाविरूद्ध लसीकरण
- कृत्रिम रेतन
- विभाग योजनेची प्रसिद्धी
- वासरांच्या अनुदानाच्या प्रकरणांवर प्रक्रिया करणे
- प्राण्यांच्या गर्भधारणेची प्रक्रिया
सेवा उपलब्ध असल्याची वेळ
अनु.क्र. | तपशील | वेळ |
1. | पशुवैद्यकीय हॉस्पिटल, टोंक-पणजी | सकाळी 8.00 ते रात्री 8.00 |
रविवार आणि सुट्ट्या | सकाळी 9.00 ते दुपारी 12.30 दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.00 |
|
2. | इतर हॉस्पिटल्स, दवाखाने | सकाळी 9.00 ते दुपारी 12.30 दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.00 |
रविवार आणि सुट्ट्या | सकाळी 9.00 ते दुपारी 12.30 | |
3. | मुख्य ग्राम उप-केंद्रे | सकाळी 9.00 ते दुपारी 12.30 दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.00 रविवार आणि सुट्ट्यादिवशी बंद |
4. | रोग अन्वेषण युनिट | सकाळी 9.00 ते दुपारी 12.30 दुपारी 2.00 ते सायंकाळी 5.00 रविवार आणि सुट्ट्यादिवशी बंद |
सेवा उपलब्ध असल्याची वेळ
पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभाग पशुआरोग्य, रक्षण आणि कल्याणाशी संबंधित आहे. हा विभाग पशु बचाव, पशु अपघात, आजारी पशुधनास होणार्या यातनांतून वाचविणे, पशुवैद्यकीय योजना आणि सेवा, डॉक्टर्ससाठी मार्गदर्शन, पशुधनांवरील क्रूरता रोखण्यासाठी कारवाई करण्यासाठी मदत पुरविणे.